

LPG Gas Shortage
esakal
Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पॅनिक होऊन लोक अतिरिक्त सिलिंडर बुक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत माहिती दिली आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून तो विनाअडथळा सुरू असल्याचं सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले.