LPG Price 1 March: सरकारचा ग्राहकांना मोठा धक्का! एलपीजी सिलिंडर महागला; 'इतक्या' रुपयांची झाली वाढ

LPG price 1 March: आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहे. कोलकातामध्ये ही वाढ 24 रुपयांनी झाली आहे.
LPG Price 1 March
LPG Price 1 MarchEsakal

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी आज, शुक्रवार, 1 मार्च LPG ते ATF दर अपडेट केले आहेत. आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहे. कोलकात्यात ही वाढ 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपये आहे.

आज एलपीजीच्या दरांमध्ये ही वाढ अहमदाबाद, मेरठ, दिल्ली, जयपूर, इंदूर, लखनौ, आग्रा, मुंबईसह संपूर्ण देशात झाली आहे. मात्र, केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. गेल्या ऑगस्टपासून 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलेला दिलासा कायम आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price 1 March
Sakal Podcast : ​एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार

आज किती दराने मिळणार सिलिंडर?

आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1769.50 रुपयांऐवजी 1795 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरची किंमत आता 1887 रुपयांऐवजी 1911 रुपये आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता 1749 रुपये झाला असून चेन्नईत 1960 रुपये झाला आहे.

आग्रामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून 1817.5 रुपयांऐवजी 1843 रुपयांना मिळणार आहे. जयपूरमध्ये आता 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1818 रुपयांना मिळणार आहे. लखनऊमध्ये तो आता 1883 रुपयांऐवजी 1909 रुपये झाला आहे. अहमदाबादमध्ये तो 11816 रुपये झाला आहे. आजपासून हा सिलिंडर इंदूरमध्ये 1901 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 1876 रुपयांना उपलब्ध होते.

LPG Price 1 March
Solar Power Generation : ‘पीएम सूर्यघर’ देणार मोफत वीज; एक कोटी कुटुंबांना होणार फायदा

घरगुती सिलिंडरचे दर 1 मार्च 2024

घरगुती LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये आणि कोलकात्यात 929 रुपये आहे. आज 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. घरगुती सिलिंडरच्या किमती 30 ऑगस्ट 2023 रोजी बदलण्यात आल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर 1103 रुपये होता. यानंतर ते एकाच वेळी 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com