हॉस्पिटलच्या आवारातच आता ऑक्सिजनचं युनिट; 'एल अँड टी'चा नवा उपक्रम

या युनिटच्या माध्यमातून हवेतून द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा येणार आहे.
L&T
L&T

सध्याच्या काळात रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये देशाला असलेल्या वैद्यकीय श्रेणीच्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी लार्सन अँड टुब्रोने (L&T) पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी रुग्णालयांच्या आवारात ऑक्सिजनची निर्मिती करणारी छोटी युनिट बसवण्याचं ठरवलं आहे. या युनिटच्या माध्यमातून हवेतून द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा येणार आहे. ही युनिट 1750 खाटांच्या रुग्णालयांसाठी पुरेशी होतील. (lt will deliver 22 oxygen generators to hospitals across the country)

"देशातील ज्या 22 रुग्णालयांना सध्या ऑक्सिजनची (oxygen) सर्वात जास्त गरज आहे व जेथे ऑक्सिजनच्या पुरवठ्याची व साठवणुकीची काहीच व्यवस्था नाही, तेथे हे युनिट प्राधान्याने बसवले जातील. तत्काळ कार्यान्वित होणारी ही युनिट चालविण्यासही अत्यंत सोपी आहेत. विशेष म्हणजे एकदा बसवली की ही युनिट पुढची पंधरा वर्षे काम करत राहतील", अशी माहिती एलअँडटी चे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम् यांनी दिली.

L&T
तुम्ही कोणता मास्क वापरता? निवड करतांना 'ही' काळजी घेताय ना?

या युनिट्सपैकी नऊ उपकरणांचा पहिला संच 9 मे रोजी भारतात पोहोचेल. त्यानंतर ही उपकरणे ऑक्सिजनची प्रचंड गरज असलेल्या आणि ऑक्सिजनच्या घाऊक पुरवठ्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा नसलेल्या हॉस्पिटल्समध्ये हळूहळू पोहोचवली जातील.

“ही परिस्थिती अभूतपूर्व आहे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याचे विदारक परिणाम पाहून आम्हाला अत्यंत वेदना होत आहेत. मानवी आयुष्याहून अधिक महत्त्वाचे काहीच नाही आणि या काळात देशाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एलअँडटी कटिबद्ध आहे. आमच्या भारतातील आणि विदेशातील टीम्सनी गेल्या काही दिवसांपासून आपले संपूर्ण लक्ष भारतातील स्थितीवर केंद्रित केले आहे व इथे ऑक्सिजन जनरेटर्स आणि पीएसए युनिट्सची जुळणी करण्यासाठी आवश्यक इतर भाग मागवून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आपण सारे मिळून कोव्हिड-19 च्या या संकटातून नक्कीच बाहेर पडू,” एल अँण्ड टीचे सीईओ आणि एमडी एस एन सुब्रमण्यम म्हणाले.

प्रत्येक युनिटची क्षमता 1000 लीटर्स प्रति मिनिट (एलपीएम) ते 500 लीटर्स प्रती मिनिट इतकी आहे. यातील 100 एलपीएम क्षमतेचे मशीन एकाचवेळी 100 हून अधिक बेड्सना सेवा पुरवू शकेल. 500 एलपीएम क्षमतेचे मशीन कोणत्याही वेळी 50 हून अधिक बेड्सना सेवा पुरवू शकेल.

हॉस्पिटल्सची ऑक्सिजनची गरज दीर्घकालीन पातळीवर पूर्ण करण्याच्या कामी एलअँडटीने हे योगदान देऊ केले आहे. हे कायमस्वरूपी युनिट्स हॉस्पिटल्सना पुढील 10-15 वर्षे वापरता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com