Lucknow Cylinder Blast : लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सिलिंडरचा स्फोट! पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू; मोठ्या आवाजामुळे छत, भिंती कोसळल्या

Lucknow Cylinder Blast : घराच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे छत आणि भिंती देखील कोसळल्या.
Lucknow Cylinder Blast
Lucknow Cylinder Blast Esakal

Lucknow Cylinder Blast : लखनऊमधील काकोरी शहरात काल (मंगळवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जरदोजी कारागिराच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की, लोकांनी स्फोटाचा आवाज दूरवर ऐकला. स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे घराचे छत व भिंती देखील कोसळल्या.

या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूचे लोकही घाबरून घराबाहेर पडले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ५० वर्षीय जरदोजी कारागीर मुशीर, त्यांची पत्नी ४५ वर्षीय हुस्ना बानो, सात वर्षांची भाची रैया, चार वर्षांची हुमा आणि दोन वर्षांच्या हिना यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Lucknow Cylinder Blast
Mobile Battery Explosion : मोबाइल बॅटरीचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू

या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांच्या म्हणण्यानुसार खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच एसीपी, सीएफओ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वीज विभागाला माहिती देऊन वीज बंद केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर करून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. प्रथम मुशीरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर महिला व मुलांना आतून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांचा श्वासोच्छवास सुरू होता. काकोरी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. मुशीर पप्पू, बब्बू, बबलू या भावांसोबत राहत होता. त्यांचा वर जरदोजीचा कारखानाही होता. मंगळवारी मुशीरच्या लग्नाचा वाढदिवस होता. मेहुणा अजमत तीन मुलांना घेऊन मुशीरच्या घरी आला होता.

Lucknow Cylinder Blast
Sangola News : टायर गोदाम स्फोट प्रकरणाचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश; विमा रक्कम मिळवण्यासाठी रचला कट

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुशीर दुसऱ्या मजल्यावर राहत होता. त्यांनी मोठ्या खोलीचे जरदोजी कारखान्यात रूपांतर केले होते. दुसऱ्या खोलीच्या कोपऱ्यात त्याने स्वयंपाकघर बनवले होते. येथे दोन सिलिंडर वापरले जात असे. आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, त्यानंतर आगीच्या दोन्ही सिलिंडरचा स्फोट झाल्याचे घरातील सदस्यांनी सांगितले.

स्विच बोर्ड जळाल्याचे आढळले

अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. स्विच बोर्ड जळालेला आढळून आला. यामुळे लागलेली आग एलपीजी सिलेंडरपर्यंत पोहोचली आणि त्याचा स्फोट झाला. जवळच आणखी एक सिलिंडर होता, दोघांचा एक एक स्फोट झाला.

धुरामुळे बचाव कार्यात अडचण

धुरातून बचाव कार्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळेच दोन-तीन वेळा पाणी ओतण्यात आले. धूर कमी झाल्यावर जवान आत शिरू शकत होते. स्थानिक लोकांनीही अग्निशमन दलाला सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com