Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Double Decker Bus Overturns in Major Road Accident : अनेक प्रवासी बसमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

esakal

Updated on

Lucknow Double Decker Bus Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एका मोठ्या बस अपघाताची बातमी समोर आली आहे. डबलडेकर बस उलटल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही डबलडेकर बस पंजाबहून बिहारला जात होती.

लखनऊच्या गोसाईगंज पोलिस स्टेशन परिसरात पूर्वांचल एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला. प्राथमिक अहवालानुसार चालकाला डुलकी लागली होती. माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वैद्यकीय पथके बचाव कार्यात सहभागी झाली.

बस पंजाबमधील लुधियानाहून दरभंगा, बिहारला जात असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. अनेक प्रवासी बसमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. क्रेनच्या मदतीने बस बाजूला काढण्यात आली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com