Crime News: धक्कादायक! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणाने केली पार्टनरची गोळी घालून हत्या कारण...

दिल्लीत श्रध्दा वालकर हत्याप्रकरणानंतर मुंबईत सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर आता पुन्हा एक घटना समोर आली आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दिल्लीत श्रध्दा वालकर हत्याप्रकरणानंतर मुंबईत सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरात एका तरुणीवर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. मुलीचा घटस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया नावाची घटस्फोटित महिला पॅराडाईज क्रिस्टल अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहत होती. त्याच्यावर ऋषभ नावाच्या तरुणाने गोळी झाडली होती. ऋषभ सिंह भदौरिया हा लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पॅराडाईज अपार्टमेंटच्या सी ब्लॉकमध्ये रिया गुप्ता नावाच्या मुलीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. रिया अनेक महिन्यांपासून ऋषभसोबत लिव्ह-इनमध्ये होती.

Crime News
Crime News : धक्कादायक! महिलेला जिवंत पुरलं; 11 दिवसांनंतर कबर खोदून बाहेर काढलं

घटनेपूर्वी दोघांमध्ये झाला होता वाद

घटनेपूर्वी रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडणाच्या वेळी, ऋषभने रियाला गोळ्या घातल्या, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या ऋषभने घटनेनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीने मुलीच्या छातीत आणि डोक्यात गोळी झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमागचे कारण काय, याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.

Crime News
Sangli Court : पैसे, चॉकलेटचं आमिष दाखवून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षाची शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com