'यूपी'तील आदित्यनाथ सरकारला 100 दिवस पूर्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

लखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100 दिवसांत आम्ही राज्याच्या 22 कोटी जनतेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि परिणाम दिले आहेत. पूर्वीप्रमाणे राजकीय संरक्षण मिळत नसल्याने भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

भाजप सरकारने 19 मार्च रोजी कार्यभार सांभाळला होता. निवडणुकीपूर्वीच्या आश्‍वासनानुसार योगी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीही लागू केल्या.

दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सरकारच्या कमतरतांवर बोट ठेवले. कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ता द्विजेंद्र त्रिपाठी म्हणाले, की सत्तारूढ पक्षाने आश्‍वासने दिली; मात्र ती पूर्ण केली नाहीत. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी दलित, अन्य मागास वर्ग तसेच ब्राह्मणांसह सर्वांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही यांनीही सरकारवर टीका करताना, हे सरकार काही काम करणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. आमच्यापेक्षा चांगले काम करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. समाजवादी पक्षाच्या सत्ता काळातील अनेक प्रकल्पांची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेऊन सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप सपचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lucknow news yogi adityanath and government