Lumpy Virus: लंपी व्हायरस कसा पसरतो?, लक्षणं काय? अशी घ्या प्राण्यांची काळजी

तुम्हा शेतकरी असाल तर ही बातमी वाचाच
Lumpy Virus
Lumpy Virusesakal

देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.

तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये उपाययोजना तसेच लसीकरण करण्यात येत आहे. सध्या लंपीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

या आजारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या आजारामुळे जानावरांच्या शरिराला गाठी येतात, हा व्हायरस खुप वेगाने पसरत आहे. या आजारात राजस्थान, यूपी, बिहीर, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रात पसरला आहे. या व्हयरसची लक्षणे लागण झाल्यानंतर काही दिवसांनंतर दिसून येतात.

Lumpy Virus
Bharat Jodo Yatra: RSS चड्डी जाळण्याच्या काँग्रेसच्या पोस्टमुळे भाजप आक्रमक

काय आहे लंपी व्हायरस

2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. हा त्वचाचा रोग आहे, यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतातट आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. सांगितल जात आहे,की हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो.

लंपी व्हायरसची लक्षणे

लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. जानावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होते.

लंपी व्हायरसवर उपाय

लंपीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.

माश्या, डास, गोचीड यांना मारून टाका.

जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर नसोडता पुरून टाकावा किवा जाळून टाकावा.

संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फैरावे.

या व्हायरसची लागन झालेल्या जनावरांचा मृत्यु होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com