Lumpi Disease: देशात लंपी व्हायरसचा कहर; देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpi Disease: देशात लंपी व्हायरसचा कहर; देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

Lumpi Disease: देशात लंपी व्हायरसचा कहर; देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये उपाययोजना तसेच लसीकरण करण्यात येत आहे. सध्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

लंपी व्हायरस हा पावसामुळेच पसरत असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस संपल्याने डास कमी होतील आणि लम्पीचा कहरही कमी होईल असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. गायींना या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण केलं जात आहे.

महाराष्ट्रात 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त असुन संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.

Web Title: Lumpy Virus Is Wreaking Havoc In The Country More Than 58 Thousand Cows Died Across The Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cow