

चेन्नईः तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम.के.स्टॅलिन यांनी गुरुवारी लोहयुग हे तमीळ भूमीवर ५ हजार ३०० वर्षांपूर्वी सुरू झाल्याची ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचा पुरातत्त्व विभाग याबाबतच्या संशोधनात सहभागी झाला होता. तमिळनाडूमध्ये लोहाचा वापर हा इसवीसनपूर्व ३३४५ मध्ये झाल्याचे ताज्या संशोधनात म्हटले आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सुरू झालेले कांस्य युग आणि तमिळनाडूतील लोहयुग हे समकालीन असून त्याचा कालखंड हा ५ हजार ३०० वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा शोध अहवालामध्ये करण्यात आला आहे.