माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Madhavi Raje Passes Away: माधवी राजे शिंदे यांचे आज (बुधवार) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया तसेच सेप्सिसचा त्रास होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या.
Madhavi Raje Passes Away:
Madhavi Raje Passes Away: esakal

Madhavi Raje Passes Away:

दिवंगत माधवराव शिंदे यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे शिंदे यांचे निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. त्यांच्या निधनामुळे दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने ग्वाल्हेर राजघराण्याचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्ली एम्समध्ये सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या. सेप्सिससह न्यूमोनियावर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

माधवी राजे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मंत्री धर्मेंद्र लोधी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लोधी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आदरणीय आई माधवी राजे शिंदे यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो, ओम शांती शांती!!'

काँग्रेस नेते अरुण यादव यांनी माधवी राजे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्री माधवी राजे शिंजे यांच्या निधनाची दु:खद बातमी मिळाली, ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्याला त्यांच्या पावन चरणी शांती देवो.

Madhavi Raje Passes Away:
Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

माधवी राजे शिंदे यांच्याबद्दल...

माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्या धर्मादाय कार्यात खूप सक्रिय होत्या. माधवी राजे या 24 चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या जे शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यासारख्या क्षेत्रात मदत करतात. त्या शिंदे गर्ल्स स्कूलच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षाही होत्या. त्यांनी त्यांचे दिवंगत पती माधवराव शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पॅलेस म्युझियममध्ये एक गॅलरीही तयार केली.

८ मे १९६६ रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. माधवराव शिंदे यांची गणना देशातील शक्तिशाली नेत्यांमध्ये होते. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. माधवी शिंदे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा समशेर जंग बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. माधवी राजे यांना राजकुमारी किरण राज्य लक्ष्मी देवी या नावानेही ओळखले जात होते.

माधवी राजे शिंजे यांच्या सासू विजयराजे शिंदे या जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्याच वेळी त्यांचे पती माधवराव शिंदे हे काँग्रेसचे एक मजबूत नेते होते. माधवरावांनंतर ज्योतिरादित्य शिंदे आपल्या वडिलांचा राजकीय वारसा सांभाळत होते. मार्च 2020 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

Madhavi Raje Passes Away:
Nagpur News : रेल्वेच्या जागेवरील सर्व होर्डिंग अनधिकृत! ; तपासणी होणार,उद्यापासून फलकांचे सर्वे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com