

ayush arogyam dham medical tourism madhya pradesh.
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात आयुष आणि आयुर्वेद क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठी पावले उचलण्यात आली आहेत. ११व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त भोपाळमधील पंडित खुशीलाल शर्मा शासकीय स्वायत्त आयुर्वेद महाविद्यालय व संस्थेत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रु. १८५.५० कोटींच्या २५ आयुष रुग्णालये, औषधालये आणि महाविद्यालयीन इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन केले. यामध्ये आदिवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यातील रु. १०२ कोटींच्या आयुर्वेद महाविद्यालयाचाही समावेश आहे.