Shocking Crime in Bhind
esakal
Dalit Youth Assault : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तीन युवकांनी एका दलित तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने लघवी पाजल्याचे अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणाला ग्वाल्हेरहून भिंड जिल्ह्यातील सुरपुरा गावात नेऊन हा अत्याचार (Madhya Pradesh News) केला. नंतर त्याला तिथेच सोडून आरोपी फरार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.