15 महिन्यांच्या चिमुरड्यासाठी आईची वाघाशी झुंज; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP News

15 महिन्यांच्या चिमुरड्यासाठी आईची वाघाशी झुंज; वाचा सविस्तर

असे सांगितल जाते की देव सर्वत्र सर्वांचे रक्षण करू शकत नाही, म्हणूनच त्याने प्रत्येकाला 'आई' दिली आहे. याचा प्रत्यय मध्यप्रदेशमध्ये आला आहे. मध्य प्रदेशात उमरीया जिल्हातील बांधवनगढ टायगर रिजर्व जंगला लगत असलेल्या गावात 15 महिन्याच्या एका लहान मुलावर हल्ला करून त्या जबड्यात घेवून जात होता. ती घटना त्यामुलाच्या आईने पाहिल आणि वाघासोबत दोन हात करत वाघाच्या तोंडीतून त्या मुलांना सोडवून त्याला जीवदान दिले.

या बचावामध्ये मुलगा आणि त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी मानपुर मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ही घटना रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान घडली आहे. या घटने नंतर गावातील लोक वाघाच्या दहशतीमध्ये आले आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमरिया जिल्ह्यातील मानपूर पोलिस स्टेशन अंतर्गत बांधवगड व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रोहनिया गावात पहाटे सर्व नीट होतं.

गावातील लोक शेती कामात व्यस्त होते. या दरम्यान एका झाडीत लपलेल्या वाघाने त्या लहान मुलावर झेप टाकली आणि जबड्यात धरून तो त्याला घेवून चालला होता. ते पाहून मुलाच्या आईने मुलाला सोडवण्यासाठी वाघासोबात दोन हात केले. त्यानंतर मुलाच्या आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईच्या शरिराचे लचक्के वाघाने तोडले आहेत. त्यातच मुलगा आणि आई गंभीर जखमी झाले.

Web Title: Madhya Pradesh Bhopal Mother Clashed Tiger Save Son Umaria

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..