esakal | Video : जखमी पोलीस अधिकाऱ्याला ज्योतिरादित्य शिंदेंचा आधार, रस्त्यावरच दिला प्रथमोपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiraditya scindia

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी शिंदे यांच्या कृत्याचे कौतुक केले.

Video : जखमी पोलीस अधिकाऱ्याला ज्योतिरादित्य शिंदेंचा आधार, रस्त्यावरच दिला प्रथमोपचार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

एका जखमी पोलीस अधिकाऱ्याला (Police Constable) मदत करतानाचा भाजप (BJP) खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी शिंदे यांनी संबंधित पोलिसाला रस्त्यावर प्रथमोपचार दिला. जखमी पोलीस अधिकारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनातून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.  

आपल्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याचे कळताच ज्योतिरादित्य शिंदे आपल्या वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी जखमी पोलिसाच्या डोक्यातून होत असलेला रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलीस आणि कार्यकर्तेही घटनास्थळी गोळा झाले होते. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी शिंदे यांच्या कृत्याचे कौतुक केले. सध्या मध्य प्रदेशात कोणतीही निवडणूक नसल्याने शिंदे यांची ही कृती खरी मानवता दर्शवणारी असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. तर एकानं यावर भाष्य करताना राहुल गांधी शिंदे याच्या कृतीला टाळ्या वाजवून दाद देत असल्याचा आणि त्यात 'खूपच छान मित्रा' अशा कॅप्शने एक मीम्स पोस्ट केला आहे.

loading image