Viral Video: बस चालवताना भरचौकात चालकाला हार्ट अटॅक, दुचाकींना चिरडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus Accident

Viral Video: बस चालवताना भरचौकात चालकाला हार्ट अटॅक, दुचाकींना चिरडलं

नवी दिल्लीः बस चालवत असतांना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि एका दुचाकीला बसची धडक बसली. या अपघातामध्ये दुर्दैवाने दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

मध्य प्रदेशमध्ये गोहलपूरजवळ ही घटना घटली आहे. राणीताळच्या दिशेने निघालेल्या एम.पी. २० पी.ए. ०७६४ या क्रमांकाच्या बस चालकाला भर चौकात अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे चालकाचे बसवरली नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील या बसने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यामध्ये सहा जण जखमी झाले. बस चालकाला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत एका दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला.

हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग

अपघात झाला त्यावेळी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने जखमींना आरोग्य सुविधा तातडीने मिळू शकल्या नाहीत. या अपघातामध्ये भुरा पटेल, कार्तिक पटेल, ज्योती पटेल, वैष्णवी पटेल हे जखमी झाले आहे.

टॅग्स :accidentbus Driver