esakal | ज्योतिरादित्यांमुळं आता संपूर्ण शिंदे कुटुंब भाजपमध्ये; आजीने रचला होता पाया 
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya pradesh congress crisis jyotiraditya scindia joined bjp family information marathi

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नड्डा यांनी ज्योतिरादित्य यांचे कौतुक केले.

ज्योतिरादित्यांमुळं आता संपूर्ण शिंदे कुटुंब भाजपमध्ये; आजीने रचला होता पाया 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भोपाळ/नवी दिल्ली : मध्य प्रदेशापासून दिल्लीपर्यंत काँग्रेसला हादरवून टाकणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज, भाजपचा झेंडा हाती घेतला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडीनंतर अखेर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करून भाजपची शाल पांघरली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्योतिरादित्य यांचा पक्षप्रवेश झाला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये 
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नड्डा यांनी ज्योतिरादित्य यांचे कौतुक केले. ज्योतिरादित्य यांची आजी राजामाता विजयाराजे शिंदे यांनी जनसंघात मोठे योगदान दिले होते, असे सांगून ज्योतिरादित्य यांचा पक्ष प्रवेश कुटुंबात परत आल्यासारखा आहे, असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता संपूर्ण शिंदे कुटुंबच एका पक्षात आले आहे. त्यांच्या आजी विजयाराजे शिंदे या पक्षाच्या होत्या. त्यांच्या आत्या यशोधरा राजे मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या आमदार आहेत तर, दुसऱ्या आत्या वसुंधराराजे शिंदे राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे यांनीही 1971मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात जनसंघातून केली होती. जनसंघाचे खासदार, म्हणून ते लोकसभेत गेले होते. त्यानंतर पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी बनले. 

माझ्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. एक म्हणजे माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन आणि दुसरी काल मी आयुष्यात नव्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला.
- ज्योतिरादित्य शिंदे, नेते, भाजप

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

शिंदे गटाला डाववले
2018मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिलवला. त्यात विजयात ज्योतिरादित्य शिंदे यांचा वाटाही मोलाचा होता. शिंदे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. पण, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांना डावलण्यात आलं. त्यानंतर सरकार स्थापनेतही शिंदे गटाच्या नेत्यांना अपेक्षित खाती मिळाली नाहीत. पक्ष श्रेष्ठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तक्रारी ऐकून घेत नव्हते. अखेर मतभेद टोकाला गेल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.