Madhya Pradesh Government : मध्य प्रदेशात ६३ हजार कोटींचे ५ ग्रीनफील्ड कॉरिडॉर; १,३९८ किलोमीटर लांबीचे रस्ते उभारण्याची तयारी

Greenfield Road Corridors : मध्य प्रदेशात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ६३ हजार २९६ कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प हाती घेण्याची तयारी सुरू झाली आहे. याअंतर्गत १,३९८ किलोमीटर लांबीचे पाच नवीन ग्रीनफील्ड कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.
Greenfield Road Corridors

Greenfield Road Corridors

sakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात दळणवळणाचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ६३ हजार २९६ कोटी रुपये खर्चून १ हजार ३९८ किलोमीटर लांबीचे पाच नवीन ग्रीनफील्ड कॉरिडॉर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मध्य प्रदेश रस्ते विकास महामंडळाच्या (MPRDC) संचालक मंडळाच्या ४९ व्या बैठकीत या प्रकल्पांच्या व्यवहार्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री निवासस्थानातील ‘समत्व भवन’ येथे ही बैठक झाली. राज्यातील गावे आणि शहरे बारमाही रस्त्यांनी जोडून आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यावर यावेळी चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Loading content, please wait...