मध्य प्रदेशात ९५४ जणांना अनुकंपा नियुक्ती; २० हजार पदांच्या भरतीचीही घोषणा

MP Govt Distributes 954 Compassionate Appointments : मध्य प्रदेश सरकारने शालेय शिक्षण विभागातील ९५४ वारसांना अनुकंपा नियुक्तिपत्रे प्रदान केली आहेत. भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ही नियुक्तीपत्रे दिली.
Dr. Mohan yadav

Dr. Mohan yadav

sakal

Updated on: 

शासकीय सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने शालेय शिक्षण विभागातील ९५४ वारसांना अनुकंपा नियुक्तिपत्रे दिली आहेत. भोपाळ येथील रवींद्र भवनात २१ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते या नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात त्यांनी राज्यात ४०० नव्या सांदीपनि शाळांच्या इमारती उभारण्याची घोषणा केली. तसेच शालेय शिक्षण विभागात लवकरच २० हजार पदांची भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com