

Rescue teams evacuate flood-affected residents to safer locations amid heavy rainfall in Madhya Pradesh.
Sakal
मध्य प्रदेशातील काही भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) होमगार्ड मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सिचुएशन रूमला अचानक भेट देत राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याची माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.