

Natural Farming Subsidy
sakal
भोपाळ : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार गोशाळा चालवणाऱ्या आणि गोवंशाचे पालन करणाऱ्या पशुपालकांना शासकीय अनुदान देणार आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भोपाळमधील समत्व भवन येथे भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, खतांचे वितरण, जलसंधारण, पराली व्यवस्थापन आणि वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण अशा विविध विषयांवर चर्चा झाली. ‘मुख्यमंत्री रजिस्ट्री योजने’च्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.