Madhya Pradesh Sports: मध्य प्रदेशच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; तीन वर्षांत २०१ पदकांची कमाई, आशियाई स्पर्धेत ११ पदके

Madhya Pradesh Sports Achievements : राज्यातील ११ क्रीडा अकादमींमधून घडलेल्या खेळाडूंनी तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २०१ पदके जिंकली असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत ११ पदकांची कमाई केली आहे.
Madhya Pradesh athletes celebrate their international sporting achievements.

Madhya Pradesh athletes celebrate their international sporting achievements.

esakal

Updated on: 

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्थेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १८ खेळांसाठी ११ क्रीडा अकादमी कार्यरत असून, या अकादमींमधून घडलेल्या खेळाडूंनी गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २०१ पदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली.

Loading content, please wait...