11 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर ऑनलाइन गेमिंगवर लवकरच आणणार कायदा | Madhya Pradesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online game

11 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर ऑनलाइन गेमिंगवर आणणार कायदा

भोपाळ : मध्यप्रदेशातील (madhya pradesh) भोपाळमध्ये (bhopal) 11 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन गेमच्या (online gaming) आहारी जाऊन तसेच अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (narottam mishra) यांनी राज्य सरकार ऑनलाइन गेम नियंत्रित करण्यासाठी लवकरच कायदा आणणार असे सांगितले.

ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा


प्रसारमाध्यमांशी बोलताना मिश्रा म्हणाले, “ऑनलाइन गेम ही एक गंभीर समस्या आहे. अशा घटना टाळण्यासाठी, आम्ही मध्य प्रदेशात ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा आणत आहोत, ज्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि आम्ही लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊ.”


बुधवारी भोपाळमध्ये एका 11 वर्षीय मुलाने घराच्या टेरेसवर दोरीला लटकून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. भोपाळचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सचिन अतुलकर म्हणाले, “एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आणि तो त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलाने त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन गेमवर सुमारे 6,000 रुपये खर्च केले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top