

Industrial Safety Boost in Madhya Pradesh With Three New Battalions First Unit to Be Deployed in Khandwa Soon
sakal
मध्य प्रदेशातील वाढत्या औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा कवच देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यात SISFच्या तीन नव्या बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राज्यात सध्या १२० हून अधिक मोठी औद्योगिक युनिट्स असून, त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षित सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या तीन बटालियनपैकी पहिली बटालियन खंडवा येथे स्थापन केली जाणार आहे.