

Madhya Pradesh Tribal Art GI Tag
esakal
भोपाळ : मध्य प्रदेशातील आदिवासी कला, पारंपरिक उत्पादने आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. डिंडोरीच्या गोंड चित्रकलेला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाल्यानंतर आता आणखी सात आदिवासी कलाकृती आणि उत्पादनांना मार्च २०२७ पर्यंत जीआय मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासोबतच मांडू, कान्हा-किसली आणि पेंच येथे आदिवासी महिलांच्या संचालनाखाली कॅफेटेरिया सुरू करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपरिक कलांना बाजारपेठ मिळवून देणे आणि महिलांसाठी रोजगारनिर्मिती यावर भर दिला जात आहे.