

unesco heritage four places
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची UNESCOने दखल घेतली आहे. बाघ गुंफांची भित्तीचित्रे, गिन्नौरगड किल्ला, बटेश्वर-पदावली-ककरमठ मंदिर समूह आणि उदयगिरी गुंफा या चार स्थळांचा UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या चारही स्थळांची भारताकडून ८ जुलै २०२६ रोजी UNESCOच्या तात्पुरत्या यादीत नोंद करण्यात आली.
UNESCOच्या तात्पुरत्या यादीत भारतातील सध्या ७८ स्थळे आहेत. तात्पुरती यादी म्हणजे एखाद्या देशाला भविष्यात जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकनासाठी विचारात घ्यायच्या स्थळांची यादी. त्यामुळे या यादीतील समावेश हा अंतिम जागतिक वारसा दर्जा मिळाल्याचा निर्णय नसतो.