

madhya pradesh dolphin safari
esakal
मध्य प्रदेश : वाघांच्या सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशात आता वन्यजीव पर्यटनाचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे. चंबळ नदीत डॉल्फिन सफारी आणि गांधी सागर परिसरात गिधाड सफारी सुरू करण्याची योजना आखली जात आहे. जंगलातील प्राण्यांचे दर्शन घेण्याबरोबरच त्यांचे नैसर्गिक अधिवास, जैवविविधता आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची माहिती पर्यटकांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.