RSS ला मार्च काढण्याची परवानगी देण्याबाबत न्यायालयाने पोलिसांना फटकारलं; आदेशात म्हटलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSS

RSS ला मार्च काढण्याची परवानगी देण्याबाबत न्यायालयाने पोलिसांना फटकारलं; आदेशात म्हटलं...

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी तामिळनाडू पोलिसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मोर्चासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तामिळनाडू पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पथसंचलन करण्याची परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. (madras high court directs tamil nadu police to allow rss marches across state )

न्यायाधीशांच्या आदेशात अपीलकर्त्यांना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे, असंही खंडपीठाने म्हटले आहे.

30 सप्टेंबर 2022 रोजी, मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 2 ऑक्टोबर ऐवजी 6 नोव्हेंबर रोजी रॅली आयोजित करण्यास परवानगी देण्याचे निर्देश दिले. आरएसएसने दाखल केलेल्या न्यायालयाच्या अवमान याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. RSS तिरुवल्लूरचे सहसचिव आर. कार्तिकेयन यांनी तामिळनाडू पोलिसांविरुद्ध न्यायालयाचा अवमान याचिका दाखल केली आहे.

गेल्या वर्षी तामिळनाडू पोलिसांनी आरएसएसला राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे आणि रॅली काढण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर आरएसएसने मद्रास उच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल केली होती.

टॅग्स :BjpTamil NaduCourtRSS