
चेन्नई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांतील तपासासाठी स्थापण्यात आलेल्या सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) खरमरीत टीका करताना मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की ‘ईडी’ ही कोणत्याही वेळी हल्ला करणारा ‘ड्रोन’ नाही, किंवा त्याला दिसेल त्या प्रत्येक गोष्टीचा तपास करणारा धडाकेबाज पोलिस अधिकारीही (सुपर कॉप)नाही.