Magh Mela 2026
sakal
प्रयागराजच्या पवित्र भूमीवर, महाकुंभ २०२५ च्या दैदिप्यमान सोहळ्यानंतर आजपासून 'माघ मेळा २०२६' या आध्यात्मिक पर्वाचा अत्यंत उत्साहात श्रीगणेशा झाला. पौष पौर्णिमेच्या पहिल्याच दिवशी कडाक्याच्या थंडीवर मात करत सुमारे २१ लाख भाविकांनी गंगेच्या पात्रात श्रद्धेची डुबकी लावली. संपूर्ण संगम परिसर 'हर हर गंगे' आणि 'जय श्रीराम' च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून, भाविकांमध्ये अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.