magh mela magh pournima
sakal
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सध्या माघ मेळा सुरू आहे. काल झालेल्या मौनी अमावस्येनिमित्त जवळपास ४ कोटी भाविकांनी गंगा स्नान केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून ही माहिती दिली. आता भाविकांना वेध लागले आहेत ते माघ पौर्णिमेचे.
माघ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून तो आध्यात्मिक ऊर्जेचा दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी युक्त असतो आणि पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.