Maha shivratri: काशीत चमत्कार! बाबा विश्वनाथ चक्क आसामी कपड्यांत नटणार; ११ प्रकारच्या लाकडांनी बनवलेल्या सिंहासनावर होणार विराजमान
Grand Maha Shivratri Celebration in Kashi: महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ मंदिरात बाबा विश्वनाथांचा भव्य शाही सोहळा पार पडणार आहे. आसामी पारंपरिक वेशभूषेत सजून ११ पवित्र लाकडांच्या सिंहासनावर बाबा विराजमान होणार आहेत.
येत्या महाशिवरात्रीला काशीमध्ये महादेवांची शाही मिरवणूक निघणार आहे. या खास सोहळ्यासाठी काशी विश्वनाथ मंदिराच्या माजी महंतांच्या घरी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा बाबा विश्वनाथ चक्क आसामी पारंपरिक वेशभूषा परिधान करणार आहेत.