Mahadev Appचा फरार सट्टाकिंग क्रूझवर करतोय लग्न; 100 कोटी खर्च... सेलिब्रेटींनाही नाचवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahadev Appचा फरार सट्टाकिंग क्रूझवर करतोय लग्न; 100 कोटी खर्च... सेलिब्रेटींनाही नाचवणार

Mahadev Appचा फरार सट्टाकिंग क्रूझवर करतोय लग्न; 100 कोटी खर्च... सेलिब्रेटींनाही नाचवणार

नवी दिल्लीः महादेव ऑनलाईन जुगार अॅपचा फाऊंडर आणि संचालक सौरभ चंद्राकार लग्न करत आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो एक फरार आरोपी आहे. सौरभचं लग्न मलेशियामध्ये होत आहे.

सौरभने होणाऱ्या पत्नीसाठी तब्बल ३५ कोटी रुपयांची डायमंड रिंग बनवली आहे. हे लग्न एका भल्यामोठ्या क्रूझवर १३ फेब्रवारी रोजी होत आहे. या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड येथून तिनशेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रण आहे.

दुर्ग पोलिसांच्या माहितीनुसार ते लवकरच महादेव सट्टा अॅपचा संचालक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांना अटक करतील. परंतु तोच सौरभ मलेशियामध्ये राजेशाही थाटात लग्न करत असल्याने पोलिसांना दावा फोल ठरतोय.

महत्त्वाचे म्हणजे लग्नपत्रिकेमध्ये सौरभ चंद्राकर याचं नाव बदलून खुशविक संग हर्षिता असं छापण्यात आलेलं आहे. आई-वडीलांचं नाव मात्र खरं छापण्यात आलेलं आहे. त्याचे वडील रामेश्वर चंद्राकर हे भिलाई निगम येथून निवृत्त होऊन पत्नी राजकुमारीसह दुबईत स्थाईक झाले आहेत. तिथे त्यांचं मोठे ज्वेलरी शोरुम आहे.

हेही वाचा: Lok Sabha Election 2024: लोकसभेत काँग्रेसला कमबॅक करायचंय? एक तडजोड या ७ जागांवर चमत्कार घडवू शकतो

दुर्ग भिलाईमध्ये पाठवलेल्या लग्नपत्रिकेमध्ये १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सुफी नाईट कार्यक्रम आहे. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजता मेहंदी, साडेसात वाजता रिंग सेरेमनी आणि १० वाजता पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

या लग्नसोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय दुबईमधले मोठे उद्योगपती, नामांकित लोक सहभागी होतील. १२ फेब्रुवारी रोजी बॉलिवूड नाईट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून मुंबईतले हिरो, हिरोईन तिथं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रेटी परफॉर्म करणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना हवा असलेला हा सट्टाकिंग डामडौलात लग्न करतोय. इकडे पोलिस हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत.

टॅग्स :GamblingApp