Ujjain Mahakal Temple Case
esakal
उज्जैन : उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Mahakal Temple) सोमवारी पहाटे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. भस्मआरतीच्या वेळी दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यू होण्यापूर्वीच त्या व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा उल्लेख केला होता, ज्यामुळे त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती का, अशी चर्चा सुरु आहे.