Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर आली सरकारला जाग; VIP पास रद्द, वाहनांना बंदी

Maha Kumbh 2025 Marathi News : वाहनांना बंदी केल्यामुळं उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
Maha Kumbh Mela Stampede
Maha Kumbh Mela Stampedeesakal
Updated on

Maha Kumbh 2025 Marathi News : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तरप्रदेश सरकारला खडबडून जाग आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले असून वाहनांना देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासाठी पाच उपाययोजनांची आखणी केली आहे. आता संपूर्ण कुंभ परिसर हा ‘नो व्हेईकल झोन’ (वाहनमुक्त परिसर) असेल.

या कुंभमेळ्यामुळे उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभमेळ्यासाठी नेमण्यात आलेले पोलिस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की शेकडो भाविकांनी बॅरिकेड तोडून टाकत पवित्र पाण्याच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.

Maha Kumbh Mela Stampede
MahaKumbh 2025: हिंदूंनो तीन मुले जन्माला घाला.. ! कुंभमेळ्यात झाली घोषणा, VHPच्या बैठकीत झाले हे ५ महत्वाचे निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com