Mahakumbh Video: श्रद्धाळूंसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात पोलिसाने टाकली माती; महाकुंभातील धक्कादायक घटना

Mahakumbh Food Controversy: ही घटना प्रयागराजमधील सोरांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलाक चतुरी गावातील आहे. येथे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर भोजन तयार केले जात होते.
Video of Prayagraj police officer throwing clay on food meant for devotees at Maha Kumbh goes viral
Video of Prayagraj police officer throwing clay on food meant for devotees at Maha Kumbh goes viralesakal
Updated on

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू असून देशभरातील तसेच परदेशातील लाखो भाविक गंगा स्नानासाठी येथे येत आहेत. या भाविकांसाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोफत अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, या सेवेमध्ये अडथळा आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

महाकुंभ मेळ्यात श्रद्धाळूंसाठी तयार केले जात असलेल्या अन्नावर एका पोलिस अधिकाऱ्याने माती टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com