राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना; नरेंद्र मोदी होणार क्वारंटाईन?

टीम ई सकाळ
Thursday, 13 August 2020

अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. महंत नृत्य गोपालदास यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे.

नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. महंत नृत्य गोपालदास यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. ते काल (ता. १२) झालेल्या कृष्ण जन्माष्ठमी सोहळ्यातही सहभागी झाले होते. तसेच ते राम जन्मभूमीपूजन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते, त्यामुळे चिंता वाढली असून पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ आता क्वारंटाईन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात कोरोनाचा (COVID-19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता देशात २४ लाखांच्या वर गेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) सारख्या अनेक मोठ्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास (Nritya Gopal Das) कोरोना (Coronavirus) पॉजिटिव्ह आल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच लोकांची चिंता वाढी आहे. 5 ऑगस्टला अयोध्यामध्ये (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) भूमि पूजनाच्यावेळी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह अनेक मान्यवर लोक व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, महंत नृत्य गोपालदास यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुराच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत चर्चा केली आहे. तसेच त्यांनी रुग्णालयाचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्यासोबतही चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahant Nritya Gopal Das Chief of Ram Janmabhoomi Trust tests positive for coronavirus