CM शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह...

राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागणार
eknath shinde ayodhya tour maharashtra politics
eknath shinde ayodhya tour maharashtra politics

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरचं मुंबई दौरा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागणार आहे. (Maharashtra Amit Shah's visit to Mumbai after eknath shinde ayodhya tour maharashtra politics )

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे. पुढील रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाणं आलं आहे. अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

काही तासांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर भाष्य केलं होता. या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील अशी भविष्यवाणी पाटील यांनी केली होती. अशातच अमित शाह पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीय गोटात उलटसुलट चर्चा सुरु होत आहे.

eknath shinde ayodhya tour maharashtra politics
Devendra Fadnavis : अवकाळीचा विदर्भाला मोठा फटका!, पावसामुळे ७४०० हेक्टरवरील पिकांच नुकसान

महारष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा हे मुंबईत येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

मागील तीन महिन्यात अमित शहा हे अनेक वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये आले होते. त्याआधी नागपूरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते.

eknath shinde ayodhya tour maharashtra politics
Divorce News : आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी बायको दबाव आणतेय? तर कोर्टाचा 'हा' निर्णय दाखवा

यावेळी अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com