
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीत गेले होते
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीत गेले होते. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होतो. या नेत्यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत दोन तास चर्चा केली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे-
-महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांबाबत या बैठकीत मंथन झाल्याचं सांगितलं जातंय. येत्या काळात महाराष्ट्रातील पाच शहरात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बैठकीत संघटनात्मक बांधणीचा एक आढावा घेण्यात आला.
- विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नागपूर आणि पुणे या महत्त्वाच्या जागा भाजपच्या हातून गेल्या. यासंबंधी केंद्रातील नेत्यांच्या मनात नाराजी असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
- भाजपमध्ये बदलाची चाचपणी सुरु असल्याचंही बोललं जातं. गेल्या एक वर्षातील भाजप नेत्यांची राज्यातील कामगिरी पाहता भाजपमधील वरिष्ठ नेते चिंतींत असल्याचं सांगितलं जातंय.