
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताचा सस्पेन्स वाढला आहे. दिल्लीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पक्ष नेतृत्वाकडे सादर केली आहे. या यादीवर केंद्रीय नेतृत्वाचे शिक्कामोर्तब अद्याप झाले नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच १४ तारीख हा माध्यमांनी काढलेला मुहूर्त असून मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.