Clean Air City: महाराष्ट्रात 'या' दोन शहरात स्वच्छ हवा, केंद्राकडून सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा!

Clean Air Survey Award Announcement
Clean Air Survey Award Announcement

Clean Air Survey Award Announcement: केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयातर्फे आज स्वच्छ हवा सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात पहिल्या क्रमांकावर इंदूर शहराने आपले स्थान कायम राखले असून त्यानंतर आग्रा व ठाणे शहराने क्रमांक पटकाविला आहे. या पुरस्कारामध्ये अमरावती शहराचाही समावेश आहे.

केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली. यात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक मध्यप्रदेशच्या इंदूर शहराला मिळाला आहे. यात श्रेणीमध्ये दुसरे स्थान आग्रा तर तिसरे स्थान ठाणे शहराला मिळाले आहे.

तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत अमरावती शहराला पहिले स्थान मिळाले आहे. यानंतर मुरादाबाद व गुंटुर शहराने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला आहे. (latest marathi news)

Clean Air Survey Award Announcement
Maratha reservation : जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मराठा आरक्षणासाठी...

यावेळी भूपेंद्र यादव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील शहरे अधिक स्वच्छ करण्याच्या उद्देशाने जी उपाययोजना राबविली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. या उपाययोजनांमुळे देशातील १०० वर शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावाही यादव यांनी केला.

Clean Air Survey Award Announcement
Maratha Andolan : मराठा समाजाने आता आंदोलन मागे घ्यावं; बच्चू कडू यांनी व्यक्त केली इच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com