PM Narendra Modi | ...अन् पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
...अन् पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

...अन् पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राज्यभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीतून ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, "महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो."

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हिंदीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात, राज्य स्थापना दिवसाच्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्र आणि देशाला आपल्या योगदानाने समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. मी राज्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो.