शेळकेंच्या अटकेसाठी शोध सुरू केला. मात्र, चार ते पाच दिवस लोटले तरी थांगपत्ता मिळत नव्हता. अखेर काल माळमारुती पोलिसांनी त्यांच्या मित्रांवर दबाव टाकत अचूक माहिती घेण्यास सुरवात केली.
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके (Shubham Shelke) यांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) भाषिकवाद भडकविल्याच्या आरोपाखाली काल (ता. २४) अटक केली. चार ते पाच दिवसांपासून शेळकेंचा शोध सुरू होता. मात्र, पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता. अखेर मिरजेत विजयनगर परिसरात थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांकडून त्या ठिकाणी कारवाई करत शेळके यांना ताब्यात घेऊन कारवाई केली.