Maharashtra Karnataka Border Dispute: सीमाप्रश्नी लवकर सुनावणी घ्या महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

Maharashtra Seeks Early Hearing in Karnataka Border Case: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी २००४ पासून प्रलंबित असलेल्या खटल्याची लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute

Maharashtra Karnataka Border Dispute

esakal

Updated on

नवी दिल्ली: कर्नाटकसोबतच्या सीमाप्रश्नावरील खटला २००४ पासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर या खटल्याची सुनावणी लवकर घेतली जावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.

मराठी भाषक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असूनही ८६५ गावे आणि शहरे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे आणि शहरे महाराष्ट्राशी जोडली जावीत, असे मूळ याचिकेत म्हटले आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी या शहरांसह सीमाभागातील असंख्य गावांमध्ये मराठी लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com