दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिक वर
Breaking News
Breaking News Sakal

PM मोदींचा 11 डिसेंबरला महाराष्ट्र अन् गोवा दौरा 

पंतप्रधान मोदी 11 डिसेंबरला महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. महाराष्ट्रात, पंतप्रधान 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पंतप्रधान नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि एम्स नागपूरचे उद्घाटन करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

भाजपाचे नेते एवढे निर्ढावले आहेत की...; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशीच अवमानकारक वक्तव्ये केली, भाजपाचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपतींचा अपमान करणारे विधान केले. त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त केला जात आहे.

भाजपाचे नेते एवढे निर्ढावले आहेत की साधी माफी मागण्याचे सौजन्यही या लोकांकडे नाही. हा सत्तेचा माज असून हा माज जास्त काळ टिकत नसतो. ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवले तीच जनता तुमचा माज उतरवेल हे चंद्रकांत पाटील व त्यांच्या पक्षाने लक्षात ठेवावे, अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीत दोन कॉंग्रेस नगरसेवकांचा 'आप'मध्ये प्रवेश

दिल्ली महानगरपालीका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत आपने बहुमत मिळवलं आहे. यासोबतच पक्षात इन्कमींग सुरू झालं आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीमधील मुस्तफाबाद प्रभाग क्रमांक 243 मधील काँग्रेसच्या दोन विजयी नगरसेवक सबीला बेगम आणि ब्रिजपुरी प्रभाग क्रमांक 245 मधील नाझिया खातून यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.

'मांडस' चक्रीवादळामुळे चेन्नईत 10 हून अधिक विमान फेऱ्या रद्द

'मांडस' चक्रीवादळामुळे चेन्नईत 10 हून अधिक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यपालांनंतर चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्यपालांनंतर चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा वातावरण तापणार हे नक्की.

मराठवाड्यात विद्यार्थ्यांसारखी आता शिक्षकांचीही होणार परीक्षा

शिक्षणाचा दर्जा कमी होत असताना आता शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षा घेतली जाणार आहे. मारठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत आदेश दिले असून आता शिक्षकांची धांधल उडाणार आहे.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस 40 मिनिटं बैठक झाली आहे, ही बैठक सागर बंगल्यावर झाली आहे. मात्र कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अजून समजलं नाही. मात्र शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे मुंडेना कोणती जबाबदारी मिळू शकते का अशी चर्चा चालू झाली आहे.

गुजरातच्या विजयाचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकारला; राष्ट्रवादीची खोचक टीका

Gujarat,Himachal Pradesh Election 2022: बहुचर्चित गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं. तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. गेल्या २४ वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपानं मोडलं आहेत. या निवडणुकीत जनतेनं भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. त्यामुळे देशातील काँग्रेसची पिचेहाट झाली आहे. मात्र गुजरात निवडणुत मोदींची लाट अजून दिसून आली. दरम्यान या विजया मागे महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकाने मोठी मदत गुजरातला केली अशी चर्चा चालू झाली. त्याला कारण ठरलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक ट्विट. यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'गुजरातच्या विजयाचे खूप मोठे श्रेय महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीसांना जाते. कारण एवढी मदत कोणीही केली नसती. स्वतःच्या राज्यातील उद्योग गुजरातला देणे म्हणजे यांच महाराष्ट्रावर किती प्रेम असेल?' त्यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रतील वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn Project) प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणार होता.

Shraddha Murder Case : ..नाहीतर माझी मुलगी वाचली असती; वसई पोलिसांवर श्रद्धाच्या वडिलांचा आरोप

माध्यमांशी बोलताना श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, दिल्लीत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नीलम गोरे यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांचे मी आभार मानतो. आम्ही श्रध्दाची झालेली हत्या कधीच विसरू शकणार नाही. श्रध्दाच्या हत्येमुळं माझी प्रकृती खराब झालीय. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस व वसई पोलिसांचं काम संयुक्तपणे व्यवस्थित चाललं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी वसई पोलिसांच्या काही असकार्याच्या भूमिकेमुळं मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी. कारण, तसं झालं नसतं तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असं स्पष्ट मत श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केलं.

मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही - वसंत मोरे

ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार असून ब्रिजभूषण सिंहांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं होतं. मात्र, आता मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या संदर्भातले आदेश दिले असल्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी माहिती दिली.

रात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; संतापलेल्या पतीनं गळा आवळून केला खून

अमरोहा : आता मला सेक्स करायचा नाहीये, पत्नीच्या तोंडून हे ऐकल्यानंतर नवऱ्याचा संयम सुटला आणि कडाक्याच्या वादानंतर दोरीनं तिचा गळा आवळून खून केला. आरोपी पतीनं रात्री पत्नीला झोपेतून उठवलं आणि सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. पहिल्यांदा बायकोनं त्याची आज्ञा पाळली. काही वेळानं त्यानं पुन्हा पत्नीला उठवून सेक्स करण्यास सांगितलं. या प्रकारावर पत्नी चिडली आणि तिनं संबंध ठेवण्यास नकार दिला. पतीला ही गोष्ट आवडली नाही आणि रात्रीच दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात त्यानं दोरीच्या सहाय्यानं तिचा गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह पॉलिथिनच्या पिशवीत बांधून घरापासून 50 किमी दूर फेकून दिला. त्यानंतर पतीनं पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

'स्वास्थ्यम्' सकाळ माध्यम समूहाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

'स्वास्थ्यम्’ या सकाळ माध्यम समूहाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात "आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन" या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बर्वे यांच्यासोबत सकाळ पुणेचे संपादक सम्राट फडणीस, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या संस्थेचे महासंचालक प्रशांत गिरभणे यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

भारताला आपलं मानणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे - मोहन भागवत

प्रत्येक व्यक्ती हा हिंदू (Hindu) आहे, जो भारताला आपलं मानतो. प्रतिकूल परिस्थितीत त्याचा स्वीकार करतो. एखादी व्यक्ती कोणतीही भाषा बोलत असली, तरी कोणत्या धर्माचं पालन करते किंवा ती नास्तिक असली तरी देशाला आपलं मानते, ती हिंदूच आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं. भारतातील लोकांना विविधतेत एकतेच्या संस्कृतीत राहायचं आहे आणि या दिशेनं प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचा आणि भाषेचा अभिमान असला पाहिजे. परंतु, भारतीयांनी संघटित होऊन भारताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आधी देश प्रथम येतो. आम्ही आरएसएसच्या स्वयंसेवकांना (RSS) हेच शिकवतो, असं त्यांनी सांगितलं.

कोश्यारीवर कारवाई होणं गरजेची - उदयनराजे

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांच्या मिळून 26 खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भेटीसाठी निमंत्रित केलं होतं. या खासदारांमध्ये उदयनराजे भोसले यांचाही समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांनी खासदार भोसले यांना, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्यांकडून होत असलेल्या अवमानकारक विधानांचा विषय पंतप्रधानांसमोर निघाला का? असा प्रश्न विचारला. यावर खासदार भोसले म्हणाले की, याबाबतचं पत्र आम्ही पंतप्रधान कार्यालयाला दिले असून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की यापूर्वी राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिण्यात आले होते, जे नियमानुसार राष्ट्रपती कार्यालयाने गृहमंत्रायलयाकडे पाठवलं होतं. हा जसा एक प्रक्रियेचा भाग होता, तशाच पद्धतीने प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे आमचे पत्र सुपूर्द केले आहे असे खासदार भोसले यांनी सांगितले. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोललं पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे असंतोष दिसतो आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचं आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबाद : 60 हजार शिक्षकांची होणार परीक्षा

औरंगाबाद : विद्यार्थ्यांची हुशारी तपासण्यासाठी 60 हजार शिक्षकांची परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी विभागीय आयुक्तांचा हा आदेश असून दहा हजार जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसोबत 60 हजार शिक्षकांची गुणवत्ता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

'ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा'; JNU नंतर खलिस्तान समर्थनार्थ काॅलेजच्या भिंतींवर लिहिल्या घोषणा

हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील (Haryana Sirsa) पंजाब सीमेवर वसलेल्या डबवालीमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिल्या आहेत. डॉ. भीमराव आंबेडकर शासकीय महाविद्यालयाच्या (Dr. Bhimrao Ambedkar Government College) भिंतींवर सहा ठिकाणी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यामध्ये 'ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा' असा नारा लिहिला आहे. गुरपतवंत सिंग पन्नू आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माज सुरुच, बसनंतर कन्नड रक्षण वेदिकेनं CM शिंदेंच्या पुतळ्याचं केलं दहन

महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्रानं सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळं हा वाद केंद्रानं सोडवण्याच्या मागणीनं जोर धरला असतानाच कर्नाटकात मात्र महाराष्ट्रविरोधी वातावरणानं आणखी जोर पकडलाय. कर्नाटकात महाराष्ट्राविरोधात वातावरण आणखी चिघळलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पुतळ्याचं कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केलं आहे. त्यामुळं आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आईस्क्रीम फेकून दिलं म्हणून मुलींची वडिलांना बेदम मारहाण

पुणे - वडिलांनी आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग आल्यामुळं मुलींनी आईच्या मदतीनं वडिलांना बेदम मारहाण केली आहे. मारहाण करत वडिलांचं डोकं भिंतीवर आदळत त्यांना गंभीर जखमी केलं. हा सगळा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी भागात घडला आहे. सतीन जाधव (५१) यांनी यासंबंधी पोलिसात फिर्याद दिली आहे. शामला जाधव (५३), स्नेहल अमोलिक (३८) आणि तेजस्वी अमोलिक (३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील भाजप खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार दिल्लीला पोहोचले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार अनिल बोंडे यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या खासदारांची बैठक होणार असून राज्यपालांचं छ. शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य, तसंच कर्नाटक सीमाप्रश्नी वाढलेला तणाव याबाबत चर्चा होणार आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा पुन्हा एकदा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाला असून महाराष्ट्रातून सुरु झालेली बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र, आज कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय.

राज्यात 15 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज

राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे. मॅनदौस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. मंडौस आज रात्री ते तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकेल अशी अपेक्षा आहे. त्याची तीव्रता किती आहे ह्यावर पुढल्या गोष्टी अवलंबून राहतील. धडकण्यापूर्वी तीव्रता वाढत गेली, तर वादळ इतके तीव्र असेल की भोवऱ्यातील बाष्पधारी ढग महाराष्ट्रापर्यंत सहजपणे पोहचू शकतील. तसं झालं तर पुढल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली ह्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तीव्रता खूप जास्त असेल तर हे ढग अजून पुढे म्हणजे रत्नागिरी, रायगड, पुणे, अहमदनगर हे जिल्हे आणि मराठवाड्याचा त्याला लागून असलेला भाग येथेही पाऊस पडू शकतो.

मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते आज अंबरनाथला येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज अंबरनाथमध्ये येणार आहेत. उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या साईबाबा मंदिराचा लोकार्पण सोहळ्यालाही हजेरी लावणार असून मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप निश्चित नाही. केसरकर सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत अंबरनाथला येणार असल्याचं कळतंय.

आज 9 डिसेंबर : कालच (गुरुवार) गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकीचे निकाल लागले. यात हिमाचलची सत्ता काँग्रेसच्या हातात गेली आहे. तर गुजरात राखण्यात भाजपला यश आलं आहे. याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या ठिणग्या अजूनही उमटत आहेत, त्या अनुषंगाने काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातही विविध घडामोडी घडत आहेत. सगळे अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com