ठाकरे-शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा झटका, दिला अंतिम निर्णय

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
(Shiv Sena)
(Shiv Sena)esakal

उद्धव ठाकरेंना मोठा झटका,धनुष्याबाण चिन्ह गोठवलं

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. मात्र शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते.

कोल्हपूरसाठी काँग्रेसचा मेगा प्लॉन

कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील सुध्दा आता कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी मैदानात उतरले आहे. सतेज पाटलांच्या संकल्पनेतून कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये 100 दिवस 1239 गावांमध्ये 13 नगरपालिका आणि नगरपंचायतील सर्व क्षेत्रात 100 दिवस 13 एलईडी स्क्रीनच्या माध्यामातून 'भारत जोडो यात्रेचे' प्रेक्षेपण करण्यात येणार आहे.

शरद पवारांचं मोठ विधान; म्हणाले...

बॉलिवूडमधील मुस्लीम टक्क्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मुस्लीम अल्पसंख्यांकांचं बॉलिवूडमध्ये मोठं योगदान आहे, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गॅस सिलेंडरचा स्फोटात ४ जण ठार

जोधपूरः महाराष्ट्रात दिवसभरात आगीच्या पाच घटना घडलेल्या आहेत. राजस्थानमधूनही एक मोठी बातमी पुढे येतेय. राजस्थानच्या जोधपूर येथे सिलेंडरमध्ये गॅस भरतांना मोठा स्फोट झाला. यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

भाजपसाठी शिवसेनेच्या विरोधात शिंदे गट मैदानात

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार? कोणत्या पक्षचिन्हाच्या अंतर्गत त्यांना उमेदवारी मिळणार? निवडणूक आयोगाकडून त्यांना मान्यता मिळणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर आता शिंदे गटाने हा निर्णय घेतल्यामुळे त्याचा भाजपला मोठा फायदा होणार आहे. तर शिवसेनेची या निवडणुकीत कोंडी करण्यात शिंदे-फडणवीस यशस्वी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.

काँग्रेस आमदारांकडून महिलेचा विनयभंग

काँग्रेसला देशाच्या राजकारणात वर येवू पाहत आहे तर राहूल गांधी 'भारत जोडो यात्रे'त देशभर पायी यात्रा करत आहेत, तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मध्य प्रदेशातील मधील दोन काँग्रेस आमदारांनी दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना समोर आली आहे.

मनमाडकडून मालेगाव कडे गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात 

मनमाडकडून मालेगावकडे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक कानडगाव जवळील पाणपोई फाट्यावर पलटी झाला आहे. हा ट्रक पलटी झाल्याने त्यातील काही सिलेंडरचा स्फोट झाला. अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही..या अपघातामुळे मनमाड मालेगाव महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन तीन किलोमीटर च्या रांगा लागल्या आहेत. चांदवड पोलिस घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे

सांगलीत गाडी जाळून खाक; घटनेत एकाचा मृत्यू

सांगलीत गाडी जळून त्यामध्ये एका तरुणाचा मृत्य झाला आहे. चार चाकी गाडी यामध्ये जळून खाक झाली आहे. सांगलीतील खालापूर मधील मगबूल पटेल असं या तरुणाच नाव आहे.

मुंबईतल्या कुर्ला येथील इमारतीला भीषण आग; इमारतीमध्ये काही जण अडकले आहेत.

मुंबईतल्या कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीत अडकलेल्यांची बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

एकनाथ शिंदे पोटनिवडणूकीत उमेदवार देणार नाही

एकनाथ शिंदे अंधेरी पोटनिवडणूकीत उमेदवार देणार नाहीत. केवळ भाजप ला फायदा व्हावा म्हणून शिंदेंनी आयोगाला पाठवले पत्र. ठाकरे गटाचे निवडणूक आयोगात उत्तर दाखल. निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते कागदपत्रांची तयारी पाहण्यासाठी ठाकरेंनी आयोगाला दिले निमंत्रण.

'धनुष्यबाण' चिन्ह कोणाला मिळणार? उद्धव ठाकरे गटाने दिला 800 पानांचा ई रिप्लाय

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात आज निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे गटाने 800 पानांचा E रिप्लाय सादर केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला भेट देऊन ही माहिती माध्यमांना दिली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आज प्रत्यक्षात भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी घेतली अपघातग्रस्तांची भेट 

नाशिक अपघातात जखमी झालेल्याची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी घेतली आहे. घटनास्थळी जाऊन शिंदे यांनी पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातग्रस्तांची भेट घेऊन विचारपुसही त्यांनी केली आहे.

प्रथमेश सावंत या गोविंद्याचा मृत्यू

मुंबईतील दुसऱ्या गोविंद्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून केइएम मध्ये उपचार सुरु होते. मुख्यमंत्री,मुंबई काँग्रेस शिवसेना सगळ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला पण प्रथमेशची झुंज अयशस्वी ठरली

नाशिक सप्तशृंगी गडावर एसटी बसला आग; जीवितहानी नाही  

वणी गडावर जाणाऱ्या बसल्यासुद्धा आग लागली. अर्धा तास आधीची घटना आहे. तेथील स्थानिक रहिवासी व प्रशासनाने आग विझवली आहे. कुठलीही जीवित हानी झालेली नाही.सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली घटना. कुठल्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसल्याची एसटी प्रशासनाची माहिती. घटनेनंतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक बस दुर्घटनास्थळी दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक बस दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते तेथील अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेत आहेत. त्यांनी स्वत: घटनास्थळी जावून पाहणी केली आहे.

मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिकमध्ये बस दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटत नसल्यामुळे संबंधित मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असून त्याचबरोबर इतर फॉरेंसिन्क टेस्ट काण्यात येणार असल्याची महिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. त्याचबरोबर मृतांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत कक्ष तयार करण्यात आलं असून दोन तोल फ्री नंबरही देण्यात आले आहेत.

नाशिक बस अपघातानंतर पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नाशिकला रवाना

नाशिक बस अपघातानंतर पाहणी करण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्व अधिकारी, प्रशासकीय वर्गाच्या संपर्कात आहे. जखमींचा जीव वाचवण्याचा प्राधान्य दिलं जाईल. काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केलंय त्यांच्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू असंही शिंदे म्हणलेत.

नाशिक अग्नितांड; अनेकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग

नाशिक येथील अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत.आतापर्यंत या चौकात अनेक अपघात झाले आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातात 18 जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तातडीनं या चौकातील अतिक्रमण काढून, तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बसमध्ये अतिरिक्त प्रवासी होते का? चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू; मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया

नाशिकच्या नांदूरनाका परिसरात खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस आणि आयशर ट्रकची धडक झाली. या अपघातानंतर बसने पेट घेतला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस चिंतामणी ट्रॅव्हलची होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड चिंतामणी ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे. तसेच नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी देखील बोलंण झाल्याचं राठोड यांनी सांगितलं.

अग्निशामक दल उशिरा पोहोचली मनपा आयुक्तांकडे प्रत्यक्षदर्शींची तक्रार

नाशिक बस अपघाताच्या ठिकाणी अग्निशामक दल उशिरा पोहोचल्यामुळे मदत कमी पडली असल्याची तक्रात प्रत्यक्षदर्शींनी केली आहे

नाशिक बस अपघातग्रस्तांना पंतप्रधान निधीतून मदत जाहीर 

नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून 2 लाखांची त्याचबरोबर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

छगन भुजबळांनी घेतली जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांची भेट

नाशिक बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावून छगन भुजबळ यांनी भेट घेत विचारपुस केली.

भाजपचे माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक - विनायक राऊत

भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केलाय. विनायक राऊत यांच्या या दाव्यानंतरराजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. संजय देशमुख हे शिवसेनेत येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. संजय देशमुख यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती असंही विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.

मुंबईमध्ये रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात  साचलं पाणी

रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचुन राहिलं आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक मंदावली आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. भोईवाडा, वाळकेश्वर, अंधेरी सबवे या परिसरात पावसाचे पाणी साचले असल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीची घोषणा केली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना तातडीने चांगले उपचार दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

या घटनेची चौकशी होणार- मुख्यमंत्री 

या भीषण अपघाताची चौकशीही केली जाईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अपघातात चूक कोणाची होती, याची सखोल चौकशी होईल. तसंच मदत पोहोचायला उशीर झाला का, याचाही तपास केला जाईल. दोषींवर कारवाईही करु, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी सांगितले आहे.

खासगी रुग्णालयांचीही मदत घ्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश 

अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांवर नाशिकच्या शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण गरज लागली तर जखमींना चांगल्यातले चांगले उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घ्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

LIVE Update: नाशिकमध्ये अग्नितांडव, बसला आग लागून 12 प्रवाशांचा मृत्यू

नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला असून त्यामध्ये ८ ते १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३२ ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि जवान दाखल झाले असून तोपर्यंत प्रवाशी मृत्यूमुखी पडले होते. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. आज राज्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आजनिकाल आहे. त्याचबरोबर अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत एका क्लिकवर.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com