Marathi News Update : मंत्रिमंडळ विस्तार, पाऊस अन् दिवसभरातील इतर घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : मंत्रिमंडळ विस्तार, पाऊस अन् दिवसभरातील इतर घडामोडी एका क्लिकवर

कलम ३७० का हटवलं? केंद्राने कोर्टात सादर केलं प्रतिज्ञापत्र

केंद्र सरकारने कलम 370 हटवण्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर लिखित स्वरूपात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यात केंद्रीय गृहमंत्रालयाने काही मुद्दे सांगितले आहेत.

  • यामध्ये मागच्या 3 दशकापासून आतंकवाद सुरू होता, तो कमी करण्यासाठी 370 कलम हटवणे एकमेव उपाय होता, असं सांगण्यात आलेलं आहे.

  • तसेच आज जम्मू काश्मीरमधील पर्वतीय भागात शाळा, कॉलेज, उद्योग सामान्य पद्धतीने सुरू आहेत. औद्योगिक विकास होत आहे, लोक आनंदाने जगत आहेत

  • दहशतवाद्यांकडून दगड फेकीच्या अनेक घटना घडत होत्या. 2018 पूर्वी 1767 घटना घडल्या होत्या पण 370 कलम हटवल्यानंतर दगडफेकीची एकही घटना घडली नाही

  • 2018 मध्ये 52 बंद आणि संप झाले होते, 2023 मध्ये एकही घटना घडली नाही, सामान्य लोकांसाठी अनेक चांगल्या सुविधा सुरू केल्या आहेत, हे मुद्दे प्रतिज्ञापत्रामध्ये केंद्र सरकारने नमूद केले आहेत.

नागपुरात उद्धव ठाकरेंच्या सभेत गोंधळ

उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे त्यांची सभा होतेय. सभा सुरु होण्यापूर्वीच सभागृहात काहींनी गोंधळ घातला. उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं.

उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या चौथ्या विस्ताराला उद्याचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईबाहेर असल्याने विस्ताराची अंतिम चर्चा होवू शकलेली नाही. मात्र उद्याचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधीमंडळाला नवीन इमारत मिळण्याची शक्यता

नव्या संसद भवनाप्रमाणे राज्यात नवं विधीमंडळ बांधलं जावू शकतं. सध्याच्या विधीमंडळ पार्किंग जागेतच नवे विधीमंडळ बांधण्याचा विचार असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच देणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाईची मागणी

अधिवेशनाच्या अगोदर राष्ट्रवादीच्या आमदारांवर तात्पुरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. नऊ जण ज्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करा अशी मागणी शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

एकनाथ शिंदे यांचा धुळे दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, शिंदेंचं विमान जळगावला वळवलं

एकनाथ शिंदे यांचा धुळे दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेंचं विमान जळगावला वळवलं आहे. खराब वातावरणामुळे हे विमान धुळ्यात उतरवणे शक्य नव्हते त्यामुळे ते जलगावकडे वळवलं आहे.

बँड स्टँड समुद्रात बुडालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड समुद्रात बुडालेल्या महिलेचा मृत देह सापडला आहे. महिला समुद्रात बुडाल्याच्या तब्बल 17 तासानंतर मुंबई कोस्ट गार्ड जवानानी महिलेचा मृतदेह शोधून काढला. बँड स्टँड परिसरात असलेल्या किल्ल्याजवळ समुद्रात ही महिला पाय घसरून पडली होती. काल रात्री साता वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मुंबई अग्निशमन दल, महापालिकेचे जीव रक्षक यांनी काल त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र रात्री समुद्राला आलेली भरती यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले.आज सकाळी पुन्हा हे शोध कार्य सुरू करण्यात आल्यानंतर किल्ला परीसरात या महिलेचा मृतदेह आढळून आला.

'...तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील'; झिरवाळांचं मोठं वक्तव्य

सर्व बाजुने विचार केला तर ते १६ आमदार अपात्र होतील असं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

येत्या एक ते दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता - संजय शिरसाट 

येत्या एक ते दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. तर तिन्ही नेते हुशार आहेत. एकत्र बसून ते निर्णय घेतील असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले आहेत .

विधानसभा अध्यक्षांकडून अपात्र आमदारांच्या मुद्यांवरून नोटिस 

विधानसभा अध्यक्षांकडून अपात्र आमदारांच्या मुद्यांवरून नोटिस देण्यात आली आहे. तर या नोटिसला उत्तर देण्यासाठी शिंदे गट विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागणार आहेत. तर या नोटिसला कायदेशीर उत्तर देणार असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक बघून आम्ही घोषणा करत नाही - उद्धव ठाकरे 

निवडणूक बघून आम्ही घोषणा करत नाही - उद्धव ठाकरे 

भाजप निवडणूक बघून घोषणा देते, योजना देते

राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून घोषणांचा पाऊस - उद्धव ठाकरे 

ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी जावं - उद्धव ठाकरे 

ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी जावं - उद्धव ठाकरे 

मी माझी शिवसेना मलिन होऊ देणार नाही गंगेत फेकलेल्या मृतदेहाप्रमाणे मी शिवसेना मलिन होऊ देणार नाही. त्यामुळे ज्यांना सोडून जायचं त्यांनी जावं असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

घरी बसलो पण कोणाची घरफोडी नाही केली - उद्धव ठाकरे 

घरी बसलो पण कोणाची घरफोडी नाही केली - उद्धव ठाकरे 

सत्ता नसतानाही आम्ही सामन्यांची कामे केली

सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या

भाजपला दुसऱ्यांची घरे फोडण्याची वेळ का आली

पैशांचा वापर करून विरोधकांना फोडतात

'मी मतांची भीक मागतो, बोगस उद्योग करत नाही'- उद्धव ठाकरे

'मी मतांची भीक मागतो, बोगस उद्योग करत नाही'- उद्धव ठाकरे

काही बोगस लोक म्हणतात मी मतांची भीक मागायला आलोय

मी आता काहीच देऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

भाजपला सत्तेची मस्ती पण आत्मविश्वास नाही

भाजप म्हणजे राजकारणातील नामर्द

भाजपवर ही वेळ का आली?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना समन्स

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना समन्सबजावण्यात आलं आहे. आसाम राज्यातील काछाड जिल्हा न्यायालयाने समन्स दिलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवरून तक्रार करण्यात आली होती . खर्गे यांच्यासह निवडणूक प्राधिकरणचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, सिलचर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत पॉल आणि इतर दहा नेत्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 8 ऑगस्टला याबाबतची सुनावणी होणार आहे. काँग्रेस नेत्यांना लेखी खुलासा सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक वादात सापडण्याची शक्यता आहे.

'अजित पवारांना व्हिलन केलं जातंय, दादा मोठे नेते…'; रोहित पवारांचं वक्तव्य

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी बंड केलेल्या नेत्यावर टीका केली आहे. 'नाशिकमध्ये भुजबळ बोलत असताना त्यांनी सहजपणे अजित पवारांना बाजूला काढलं. माझा अनुभव आणि वय कमी पडतं. पण तिथे सहजपणे पार्टी फुटण्याचं खापर अजित पवारांवर फोडलं. नाशिकमध्ये पोस्टरवर अजितदादांचा फोटोही नव्हता. म्हणजेच हे चार पाच नेते अजित दादांना व्हिलन करत आहेत. अजितदादा मोठे नेते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय लोकांनाही पटला नाही आणि आम्हाला पटला नाही. सध्या सुरू असलेलं राजकारण भाजपा एसीत बसून बघून मजा घेतंय आणि आम्ही आमच्यातच भांडतोय. कुटुंब कोणी फोडलं, पार्टी कोणी फोडली हे कोणी विसरणार नाही', असंही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी

सत्तासंघर्षाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता. त्यावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याबाबतची याचिका दाखल केली होती. तर या ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला, भूमकर पुलावरील घटना

मुबंई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे परिसरात नवले पुलाजवळील भूमकर पुलावर सताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेणारा कंटेनर भूमकर पुलाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास पलटी झाला आहे.यात अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.कंटेनर अक्षरशः लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला असून,कंटेनर मधील कोळसा महामार्गावर पसरला असून,बघ्याची मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभाग दाखल झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Accident
Accident

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया  

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा उपमुख्यमंत्री झाले त्याचा आनंद वाटतो असं त्यांच्या आईंनी म्हंटलं आहे. त्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या आहेत.

मोहोळच्या आजी-माजी आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने व मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी निवस्थानी सदिच्छा भेट घेतली.

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रतिउत्तर म्हणून अंगरक्षकांनी देखील केला गोळीबार

उल्हासनगर मधील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आलाय.दरम्यान प्रत्युत्तर दाखल त्यांच्या अंगरक्षकांनी देखील गोळीबार केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. कम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिर शेजारी रोहरा यांचे कार्यालय आहे.संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले,त्यांच्या कडे हत्यारं असल्याने रोहरा यांच्या अंगरक्षकांनी त्याना कार्यालयात जाण्यापासून रोखले, मात्र ते पळून जात असताना एका जणाला त्यांनी पकडून मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी या आज्ञातांनी समोरून गोळीबार केला त्यामुळे रोहरा यांच्या अंगरक्षकांनी देखील त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून याप्रकरणी उल्हासनगर ही लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून उद्या ते अमरावती जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com