आज देशात अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

आज देशात अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

"पुणे बंद'मुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मंगळवारी (ता.13) बंद पुकारण्यात आला आहे. त्यानिमित्त पक्ष व संघटनांकडून मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभुमीवर मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या मोर्चाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथुन सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा टिळक चौकातुन लक्ष्मी रस्त्यावरुन उलट दिशेने बेलबाग चौक, डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जाऊन जिजामाता चौक येथील लाल महाल चौकात येणार आहे. तेथेच या मोर्चाचा समारोप होणार आहे. त्यामुळे डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना या भागातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मोर्चाच्या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतुक परिस्थिती पाहून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी टिळक रस्ता, केळकर रस्ता व कुमठेकर रस्त्याचा वापर करुन इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी केले आहे.

पुण्यातील आर.टी.ओ कार्यालयासमोर ९ तासापासून रिक्षा चालकांचा ठिय्या

पुण्यातील रिक्षा चालकांचे चक्का जाम आंदोलन

शहरातील आर टी ओ कार्यालयासमोर ९ तासापासून रिक्षा चालकांचा ठिय्या

रिक्षा चालकांनी रस्ता जाम केल्याने पुणेकरांचा खोळंबा

आर टी ओ कार्यालय चौकातील वाहतूक बंद

संचेती हॉस्पिटल पासून पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता देखील बंद, जुना बाजार चौकतून आर टी ओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद. जहांगीर हॉस्पिटल चौकापासून संचेती हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता देखील बंद

रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर सोडून काही रिक्षा चालक गेले घरी

पुण्यात उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाल्यानं डाॅक्टरला मारहाण

पुण्यात धक्कादायक प्रकार घडला, पाळीव मांजराला उपचारासाठी दवाखानात आणले असता त्याचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाल्याने डॉक्टरला मारहाण करत क्लिनिकची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिंदे-ठाकरे गटात तुफान हाणामारी

शिंदे-ठाकरे गटात तुफान हाणामारी झाली आहे.

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली CM पदाची जबाबदारी

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपला 156 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

माझ्या विचारांचा सरपंच झाला तरच निधी देईन; नितेश राणेंची धमकी

माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही. निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही. कणकवली नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची धमकी दिली आहे.

आरटीओ चौकातून पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद

पुण्यात आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालक एकवटले आहेत. बेकायदा टॅक्सी बंद होत नाही तोपर्यंत रिक्षा आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतली आहे. हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठीय्या आंदोलन केलं आहे. रिक्षा चालकांनी रस्ता जाम केला आहे. १० हून अधिक संघटना या संपात सामील झाल्या आहेत.

पुण्यात आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालक एकवटले

पुण्यात आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालक एकवटले आहेत. बेकायदा टॅक्सी बंद होत नाही तोपर्यंत रिक्षा आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतली आहे. हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठीय्या आंदोलन केलं आहे. आरटीओचे अजित शिंदे यांच्या विरोधात रिक्षा चालकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे.

अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. परंतु देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली आहे.

अटीशर्तीसह अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

पुण्यात रिक्षाचालक संघटना आक्रमक; आज पुन्हा करणार 'चक्काजाम'

रिक्षाचालक पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन करणार आहे. त्यामुळे पुण्यातील रिक्षा वाहतूक सोमवारी बंद राहणार आहे. रिक्षा संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने रिक्षाचालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणातील अटकेत असणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची पिंपरी पोलिसांकडून सुटका

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी अटकेत असणारे पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी पोलिसांकडून सोडण्यात आले आहे. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांना सोडून दिलं आहे. गोविंद वाकडे हे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींच्या आधीपासून संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर काल रात्री गोविंद वाकडेंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या लढाईला आजपासून सुरुवात

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या लढाईसाठी निवडणूक आयोगासमोर आज युक्तिवाद सुरू होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे.

अनिल देशमुखांना जेल की बेल? हायकोर्टात आज सुनावणी 

 सीबीआयनकडून दाखल करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे. आज अनिल देखमुख यांना दिलासा मिळेल की पुन्हा जेल मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज, (12 डिसेंबर) होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. सोबतच भाजपचे अन्य राज्यांतील काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.