
शनिवारी रात्री ८ वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांची माहिती मिळालेले लोक आपापल्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर मोकळ्या ठिकाणी जमले. याआधी संध्याकाळी ४.२५ वाजता उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हे भूकंपाचे केंद्र होते. रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेची नोंद करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरच्या विठुराया चरणी भाविकांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आले आहे. यंदा विठ्ठलाच्या दानपेटीत भक्तांकडून ३ कोटी २० लाखांचे दान अर्पण करण्यात आले आहे.
जम्मू जिल्ह्यातील अखनूरमध्ये बस उलटली झाली आहे. यात शाळकरी विद्यार्थिनींसह 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि स्थानिक लोक मदत आणि बचावकार्यात करत आहेत. अखनूरहूनगर मजूरला जाणारी ओव्हरलोड बस रामीन माखिन गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटली.
उत्तराखंडमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 4.25 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हे भूकंपाचे केंद्र होते. रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेची नोंद झाली.
नेस्को सेंटरमधील एका कार्यक्रमामुळे आणि एका ब्रिजचे काम चालू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरो जावे लागत आहे.
मला चौकशीसाठी बोलवलं आणि अटक केली. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घवून दिली आहे.
ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्रा आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आव्हाडांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली. शाहरुख शारजाहवरुन येत होता, त्यावेळी त्याला रोखण्यात आलं. त्याच्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हर होते, ज्यांची किंमत 18 लाख आहे. याकरता शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे समोर आले.
झारखंड सरकारने आरक्षणाची मर्यादा 60 टक्क्यांवरुन थेट 77 टक्क्यांवर नेऊन ठेवली आहे. तामिळनाडूला मागे टाकत देशात सर्वाधिक आरक्षण देणारं राज्य झारखंड ठरलं आहे.
जमीनाच्या अर्जावर सुनावणी झाली आहे. एक ते दीड तासाने निर्णय येणार असून तोपर्यंत आव्हाड यांच्यासह इतर आरोपींना सेफ कस्टडीत ठेवणार आहेत. जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळणार का? यावर थोड्याच वेळात निर्णय होईल
जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर निर्णयाला उशीर लागणार होणार आहे. त्यांच्या जमीनाच्या अर्जावर सुनावणी झाली आहे. एक ते दीड तासाने निर्णय येणार असून तोपर्यंत आव्हाड यांच्यासह इतर आरोपींना सेफ कस्टडीत ठेवणार आहेत.
पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली आहे. आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरेंनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. महापालिका निवडणुका जानेवारी फेब्रुवारीला लागण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काल राज ठाकरे यांच्या राजमहल या निवासस्थानी बैठक झाली. राज ठाकरे आज सकाळी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या भेटीला गेले आहेत. सद्या हर हर महादेव सह काही सिनेमामुळे वाद सुरु असल्याने राज ठाकरे मेहेंदळे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि गजानन मेहेंदळे यांच्या बैठकीत फक्त शिवचरित्रावर चर्चा
इतर कुठलीही राजकीय किंवा सामाजिक चर्चा झाली नाही...
राज ठाकरे यांनी इतिहास संशोधक याना विचारले १० प्रश्न
वेदांता, मग एअरबस टाटा असे एकापाठोपाठ पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आज पुन्हा एक प्रकल्प दुसऱ्या राज्याला मिळाला आहे. हा प्रकल्प पदरात पाडून घेण्यात राज्य सरकार अपयशी पडलं आहे. या प्रकल्पासंबंधीच्या सर्व प्रक्रिया महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ट्विटर कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केलाय. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
योगगुरू रामदेव बाबा यांना भाजप शासित प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. पतंजली समूहाच्या पाच औषधांवर आता बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाचा उत्पादन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
माणगाव ते रायगड रस्त्यावर सहलीवरुन परतत असताना बसचा अपघात झाल्याची घटना घडली. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ते प्रवासी रायगडावर गेले होते. परत येत असताना बसला हा अपघात झाला. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.