दिवसभरात देशभरात झालेल्या सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Esakal

मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार - CM शिंदे

मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता भासल्यास प्रचलित नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोरेगाव येथे आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत बोलताना दिली.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह औरंगाबादमध्ये दाखल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे औरंगाबादच्या छत्रपती संभाजी नगर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री रावसाहेब दाणवे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या सभा उन्हाळा संपल्यानंतर

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा या उन्हाळा संपल्यानंतर जूनमध्ये पावसाचा अंदाज पाहून घेण्यात येतील अशी माहिती जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर सांगितले. तसचे लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा करणार असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीची शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू

महाविकास आघाडीची शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीत २०२४ च्या लोकसभेच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रवीण सूद यांची CBIच्या संचालकपदी नियुक्ती

प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या संचालकपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे: CBI

संजय राऊत यांच्यावर नाशिक पोलिसांची कारवाई

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली.

यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत.

त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करू नये असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

कर्नाटकात भाजपच्या वागणुकीमुळे पराभव झाला - राज ठाकरे 

कर्नाटकात भाजपच्या वागणुकीमुळे पराभव झाला 

चूक झाली मान्य करा

हा भारत जोडो यात्रेचा परिणाम

जनतेला गृहीत धरू नये

हा पराभव स्वभावाचा, वागणुकीचा आहे

जनतेला गृहीत धरणं भाजपला भोवलं

अकोला दंगलीप्रकरणी ३० जणांना अटक; फडणवीसांनी घेतली परिस्थितीची माहिती

अकोल्यात शनिवारी रात्री उळलेल्या दंगलीनंतर राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पोलिस महासंचालक तसेच अकोला पोलिसांच्या संपर्कात आहेत. तसेच दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकेंना धडा शिकवण्यासाठी;भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकेंना धडा शिकवण्यासाठी होता असे विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

अकोल्यात रात्री दोन गटात तुफान राडा! दोन पोलीसांसह ८ जण जखमी

अकोला शहरातील हरिहर पेठ भागात काल रात्री दोन समाजामध्ये हिंसाचार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन्हीगटांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत अनेक वहानांचे नुकसान झाले आहे. या प्रकरानंतर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून २६ आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com